तिरंगा बांधलेल्या गाडीला आग; तरुणाची तलावात उडी… (व्हिडीओ)

0

 

उन्नाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

असं म्हणतात ना की जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही. कित्येकदा लोकांना जीवघेणे स्टंट करू नका असं आवाहन केल जातं. इतक करूनही काही मुर्खांकडून जीव धोक्यात घातला जातो. एका झटक्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी बऱ्याचदा असे स्टंट केले जातात. काहींच्या हे स्टंट अंगाशीही येतात.अशाच एका तरुणाने अजब स्टंट केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पाहणारेही चक्रावले आहेत.

या तरुणाने आधी कपड्यांना आग लावली. त्यानंतर बाईकवर बसून त्याने तलावात उडी मारल्याचा राजा बाबू स्टाईल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. एखाद्या फिल्ममधील सीन वाटावा तसा हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे त्याने गाडीवर राष्ट्रध्वज देखील बांधलेला आहे. या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. युवकाचा हा स्टंट एवढा घातक आणि जीववर बेतणारा असू शकतो याची कोणालाही कल्पना नव्हती.

व्हिडीओ उत्तर प्रदेशातील उन्नाव भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस स्टंट करणाऱ्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी झाली आहे. या तरुणाचा स्टंट पाहून इतर कोणीही असे धाडस करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.