‘स्मार्ट माझी आई’ मिना नाईक यांचे मोबाईल दुरूस्ती दुकान…

0

 

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क;

रोटरी मेन्स आणि उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या ‘स्मार्ट माझी आई’ या संकल्पनेतून निवडक महिलांना स्मार्टफोन दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिलांपैकी एक सौ. मिना नाईक यांनी मोबाईल दुरूस्ती चे दुकान यावेळी सुरु केले.

शासन समाजातल्या महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. मोठ्या प्रमाणात महिलासुद्धा शासनाच्या योजनांना प्रतिसाद देत असतात आणि स्वतःसाठी रोजगाराची निर्मिती करत असतात. जिल्ह्यात खाजगी संस्थेने पुढे येत महिलांसाठी रोजगार निर्मितीचा हा अभिनव प्रयोग राबवला आहे.

उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्राच्या ‘स्मार्ट माझी आई’ या उपक्रमाला रोटरीने ५०% अर्थसहाय्य करत निवडक महिलांसाठी ‘स्मार्टफोन दुरूस्तीचे प्रशिक्षण’ यावेळी जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आले. सौ. मिना नाईक यांनी मोबाईल दुरूस्तीचे स्वतःचे दुकान सुरु करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांच्या या धाडसाला सहकार्य करत रोटरीतर्फे मदतीचा हात म्हणून मोबाईल दुरूस्तीचे प्राथमिक किट रोटरीचे प्रांतपाल आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले. सौ. नाईक यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला रोटरीचे सह.प्रांतपाल अरुण नंदऋषी, मोनिका झुनझुनवाला,  रो.अध्यक्ष राजेश वेद, मा.सचिव गिरीष कुलकर्णी, राघवेंद्र काबरा, कॅ.मोहन कुलकर्णी, मनोज जोशी, जितेंद्र ढाके, पंकज व्यवहारे आणि उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष मकरंद डबीर, मोबाईल दुरूस्ती शिक्षक राजू निकम आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.