विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी… मुख्यमंत्र्यांचे आदेश…

0

 

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क;

मराठा (Maratha) समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

विनायक मेटे यांच्या निधनानंतर काही प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. मेटेंच्या अपघातापूर्वी 3 ऑगस्टला पुणे एक्स्प्रेसवर शिक्रापूरजवळ एका गाडीने त्यांचा पाठलाग केला होता. त्यांचा ड्रायव्हर चालक समाधान वाघमारे याने शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्या कारचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या आहेत. विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मराठा समाजाचे दिग्गज नेते अशी त्यांची ओळख होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here