पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या निकिता पाटील व गीता पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपप्राचार्य दीपक भावसार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुधीर शहा तर दिपाली देशमुख या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच महर्षि पतंजली यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या समन्वयिका मेघना राजकोटिया यांनी सूत्रसंचालन केले.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी या प्रसंगी ९ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व ‘वसुधैव कुटुम्बकम’ या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या आशयाला अनुसरून विद्यार्थी व पालकांना योगाभ्यास करण्याचे विनम्र आवाहन केले. याप्रसंगी विशेष अतिथी योग प्रशिक्षिका व आहारतज्ञ दिपाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगिक आसने, सूर्यनमस्कार, संतुलित आहार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ.सुधीर शहा यांनी विद्यार्थी मित्रांना मन आणि शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच आत्मविश्वास, सकारात्मकता वाढविण्यासाठी योगा केलाच पाहिजे असे आवाहन केले.

ई.८ वी व १० वी च्या समूहाने योगा नृत्य सादर केले. मानव अडवाणी या विद्यार्थ्याने योगक्रिये मुळे होणाऱ्या विविध फायद्यांची जाणीव यावेळी आपल्या भाषणातून करून दिली. योग आणि प्राणायाम करून शरीर व मन निरोगी ठेवा ह्या अशयाला अनुसुरून एक लघुनाटिका यावेळी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केली. या प्रसंगाचे औचित्य साधत ई.१० वी व १२ वी बोर्डात शाळेतून यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या कार्याक्रामादरम्यान सुमारे १००० विद्यार्थ्यांनी शाळेच्या योगशिक्षिका स्नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम केले. पोदार स्कूलचे उपप्राचार्य दीपक भावसार, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका उमा वाघ व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन उन्नती महाजन व मानसी काबरा या विद्यार्थिनींनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.