पथराडे येथील जि.प.शाळेत तीन वर्षापासून शिक्षकांची प्रतिक्षा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

मनवेल ता.यावल (Yawal) पथराडे येथील जि. प. प्राथमिक शाळेत एका शिक्षकांच्या जागा रीक्त असल्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पथराडे गावात ४०० लोकसंख्येचे गाव असून एका शिक्षकांची गरज आहे. यामुळे पालक आक्रमक झाले आहेत. येत्या आठ दिवसांत शिक्षक नियुक्त करा. अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा सरपंच योगिताताई प्रताप सोनवणे व संतप्त पालकांनी दिला आहे.

पथराडे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. १९९० मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत आजच्या स्थितीत पहिली ते चौथी पर्यंत चार वर्ग आहे. तीन वर्षापूर्वी एक शिक्षकांची बदली झाली त्या दिवसापासून एक जागा रीक्त आहे. शिक्षक एकच अन् जबाबदाऱ्या भाराभार

एका शिक्षकावर २७ विद्याथ्यांचे ज्ञानदान करणे, शासनाने मागविलेली ऑनलाईन माहिती देणे, सर्वेक्षण करणे यासह शिरागड व पथराडे या गावातील बी.एल.ओ.ची जबाबदारी आहे. विविध माहिती पुरविणे व शाळा सुरळीत सुरु ठेवणे. सर्वीच जबाबदारी एकाच शिक्षकाच्या अंगावर आहे. यामुळे येथे अजून एक शिक्षक तात्काळ नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.