स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र

0

लोकशाही विशेष लेख

प्राथमिक शिक्षक म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्था, जि. प. जळगाव अंतर्गत ग्रामिण भागातील प्राथमिक शाळेत कार्यरत राहून विविधांगी उपक्रम राबवून, शिकणं व शिकवण्याची सुयोग्य गुंफण करुन, उपक्रमशील आणि प्रयोगशिल शिक्षक म्हणून राज्यभरातील शैक्षणिक क्षेत्रात नवी ओळख निर्माण करणारे, विद्यार्थीप्रेमी शिक्षक अरुण पाटील यांनी खास विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र ‘हसत-खेळत शिकूया’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणे खूप सुंदर आहे.

एटीएम प्रकाशन यांनी 2019 मध्ये प्रकाशित केलेली ही प्रथमावृत्ती का. स. वाणी संस्था धुळे यांनी मुद्रीत केली आहे. या पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि ए. टी. एम. चे राज्य संयोजक यांनी दिलेली आहे. विक्रम अडसूळ यांनी लिहीली ही जमेची बाजू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचन-लेखन निर्णय अपेक्षित आहे, आणि ते ज्ञान अवगत करण्यासाठी अरुण पाटील यांनी तयार केलेला आहे. एकूण 58 पानांचे हे पुस्तक तयार केले आहे. त्याच्यामध्ये खूप मजेशीर संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत.

चित्रातून शब्द वाचण्याची सोय आहे. वाचा व लिहा, शब्दांची बाग त्यासोबत अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी छोट्या-छोट्या शब्दांमधून शब्द कृती तयार करण्यासाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे.मुळाक्षरांपासून तयार होणारे शब्द. बाराखडीची, चौदाखडी झाली. ती चौदाखडी सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे. शब्द दिलेले आहेत जोडाक्षरी शब्द एकूण सहा पेजवर त्यांनी दिलेले भरपूर पद्धतीचे जोड शब्द कृतीयुक्त सरावासाठी दिलेले आहेत.

समानार्थी शब्दांचाही एक समूह आहे, विरुद्धार्थी शब्द आहेत, घर दर्शक शब्द आहेत, ध्वनिदर्शक शब्द आहेत, समूहदर्शक शब्द आहेत, शब्द समूहाबद्दल शब्द आहेत, त्यासोबत पिल्लू दर्शक शब्द, म्हणी आणि त्यांचे अर्थ, त्यासोबत अंकांची ओळख १ ते ९ या अंकांची ओळख चित्रातून आणि संख्या नामातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

1 ते 100 पर्यंतचे अंक स्वतंत्र रकान्यात आणि ठळकपणे याठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. २ ते १० पर्यंत चे पाढे, ११ ते २० पर्यंतचे पाढे, २१ ते ३० पर्यंतचे पाढे दिलेले आहेत. त्याच सोबत या पुस्तकामध्ये पान नंबर ५६ वर अक्षर शब्द लेखनाचा, वाक्य लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना नियमित फळे करता यावा यासाठी ओळीसाठी एक स्वतंत्र कोरे पेज दिलेला आहे.

उजळणी पाढे लेखनाचाही

पुस्तकातून सराव व्हावा म्हणूनही हे एक स्वतंत्र चौकट असलेला रकाना एका पेजवर दिलेला आहे. आणि प्रजासत्ताक दिनाची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याने, त्यांच्या कल्पनेला वाव देण्याचे काम करणार आहे. स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त, गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र म्हणजे ‘हसत-खेळत शिकूया’ होय.
भविष्यात अरुण पाटलांनी आपल्या बालकवितांचा व बोधकथांचा संग्रह तयार करावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य संदर्भात आलेले अनुभव याच्या संदर्भात सुद्धा स्वतःचा अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कृतीं या अनुभवाची सुद्धा एक पुस्तिका काढावी. त्यांनी इंटरनेटवर लिहिलेली मराठी भाषेतील अनुदिनी म्हणजे, त्यांचा ‘तंत्रगुरु’ हा ब्लॉग सुद्धा, त्यांच्या कौशल्यात्मक कार्याला समाजासमोर आणतो..
सध्या पिंपळगाव बु ता. भडगाव येथिल जि. प. शाळेत कार्यरत असलेले, अरुण शिवाजी पाटील यांच्या लेखनासह ते शिक्षक म्हणुन करीत असलेल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा…

एकनाथ गोफणे
चाळीसगाव
8275725423

Leave A Reply

Your email address will not be published.