मानवी हृदयाची काळजी, काळाची गरज

0

लोकशाही विशेष लेख

हृदयाची काळजी घेणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. असे न केल्यास हृदयविकारासह अनेक हृदयविकार निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. हृदय सुदृढ ठेवण्यासाठी शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया मुळात सुरळीत असणे गरजेचे आहे. यासाठी हृदय गती म्हणजेच हार्ट स्पीड योग्य रीतीने होणे देखील आवश्यक आहे.

हृदय गती म्हणजे मानवी हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते ती गती होय. मानवासाठी हृदयाची उच्च आणि निम्न या दोन्ही परिस्थिती धोकादायक मानल्या जातात. हृदयाचे ठोके वाढणे ही बाब हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असण्याची शक्यात नाकारता येत नाही. त्यामुळे मानवाल श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो तसेच, छातीत दुखू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या शरीरातील सामान्य हृदय गती म्हणजेच हार्ट बीटचे प्रमाण किती असावी हे माहित असणे फार महत्वाचे आहे.

हृदयरोग तज्ञांच्या मते हृदयाच्या ठोक्यांची सामान्य श्रेणी 60 ते 100 ठोके दर मिनिट या प्रमाणात असावी. औषधे घेणाऱ्या काही लोकांमध्येही ते कमी होण्याची शक्यात असते. तर 16 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये सरासरी 80 ठोके दर मिनिट या प्रमाणात असते. 30 ते 55 वयोगटातील हे प्रमाण 74 ठोके दर मिनिट असे असावे. यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये, ही श्रेणी 70 ते 75 ठोके दर मिनिट या प्रमाणापर्यंत कमी केली जाऊ शकते. लहान बालकांमध्ये अर्थात 2 ते 11 वर्षांमध्ये ही श्रेणी 70 ते 120 पर्यंत असू शकते.

हृदयाची गती वाढण्याची अनेक कारणे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. हीच कारणे हृदयविकाराचे लक्षण ठरू शकतात. हे हृदयविकाराचा झटका किंवा अशक्तपणाचे देखील लक्षण यातून निर्माण होते. ही समस्या लहान मुलांमध्ये कमी प्रमाणात असली तरी आजकाल 30 ते 50 वर्षे वयोगटात याची अधिक प्रकरणे बघायला मिळतात.

हृदयाचे ठोके सामान्य नसल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयविकाराचा झटका येणे यांसारख्या समस्या अवेळी उद्भवू शकतात. म्हणून, हृदयाचे ठोके सामान्य श्रेणीत नसल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे. यामध्ये काही प्रकार असे आहेत की ज्यात हृदयाची धडधड कधीकधी वाढते. यात प्रामुख्याने खेळताना किंवा नाचताना हृदयाचे ठोके सामान्य स्थितीतही वाढत असतील, तर हे देखील धोक्याचे लक्षण असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अजिबात दुर्लक्ष न करता तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

राहुल पवार
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.