प्रकल्प कार्यालयात पत्रकारांचे गैरवर्तन अधिकाऱ्यांनी केले पाचतास ठीय्या आंदोलन

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या चोपडा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत गेल्या दहा दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकाराच्या चौकशी व कारवाई च्या अहवालाची मागणीसाठी मंगळवारी चोपडा येथील तीन कथीत पत्रकारांनी यावल येथील जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गाठले. सदरच्या झालेल्या कार्यवाहीच्या अहवालाची प्रत देण्यास आदीवासी विकास विभागाच्या कार्यालयाकडून असमर्थता दर्शविल्यावरून कथीत पत्रकारांनी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जोर जोराने व अर्वाच्च भाषेत बोलत गैरवर्तन केल्याने कार्यालयातील सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पाच तास ठिय्या आंदोलन देत सायंकाळी पोलीस अधिकाऱ्याकडे निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की गेल्या दहा दिवसापूर्वी चोपडा तालुक्यातील एका शासकीय आश्रम शाळेत घडलेल्या प्रकाराची तसेच कार्यालयाकडून केलेली चौकशी व कारवाईच्या अहवालाची प्रत चोपडा येथील कथित पत्रकार सचिन जयस्वाल, राजेंद्र पाटील, विनायक पाटील, यांनी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहोरे यांचेकडे मागणी केली माहोरे यांनी केलेल्या चौकशी व संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबित केले असल्याची कारवाई केली असल्याचे सांगितले. आम्हास चौकशी अहवाल पाहिजे असा त्यांनी हट्ट धरला यावर चौकशी अहवाल विद्यार्थिनी विषयी असल्याने व तो गोपनीय असल्याने देता येणार नसल्याचे सांगितल्यावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी माहुरे यांच्याशी त्यांनी वाद घालत प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांचे कक्षात जात त्यांच्याशी जोर जोराने व अर्वाच्य भाषेत बोलत वाद घातला या प्रकाराने कार्यालयातील कर्मचारी संतापले घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तात्काळ पोलीस आले असता तीघेही जन तेथून पसार झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन देत निषेधाच्या घोषणा दिल्या सायंकाळी फौजदार प्रदीप बोरुडे यांचे कडे निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे. याप्रसंगी आदिवासी संघटनेचे राज्याध्यक्ष एम.बी.तडवी उपस्थित होते त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवेदनावर ४० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.