अभिनेत्री अनुष्का शेट्टीला पाहून चाहत्यांना बसला धक्का !

0

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ मध्ये आपल्या अभिनयाची वेगळीच छाप अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) ने सोडली आहे. कदाचित तिच्या जागी दुसरा कोणी असता तर एवढा न्याय देवसेनेच्या भूमिकेला कदाचित मिळाला नसता. सध्यातरी अनुष्काचा एक फोटो तुफान वायरल होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या सहा वर्षांनंतर आता अनुष्काचा वेगळाच लूक सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. यामध्ये ती अत्यंत वेगळी दिसते आहे. अनुष्काचे हे फोटो व्हायरल झाल्यापासून तिच्या बदललेल्या लूकची खूप चर्चा होते आहे.

अनुष्का शेट्टी गेल्या बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. मोठ्या ब्रेकनंतर तिला महाशिवरात्रीनिमित्त एका मंदिरात पाहिलं गेलं. यावेळी तिला पाहून चाहत्यांना फार आनंद झाला. मात्र सोशल मीडियावर काहीजण तिला बॉडी शेमिंग (Body shaming) करू लागले.पांढऱ्या साडीतील अनुष्काचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिचं वाढलेलं वजन पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘असं पाहून खूप वाईट वाटतंय. आम्हाला तुला अधिकाधिक चित्रपटांमध्ये पहायचंय. कृपया वजन कमी कर’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर अनुष्का ही स्वत: योग प्रशिक्षक आहे, तिला फिटनेस आणि आरोग्याविषयी शिकवू नका, असा सल्ला तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.