यावल, रावेर, चोपड्यात गुटख्याची सर्रास विक्री

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या इतर राज्यातुन तस्करी करून आयात करून विक्रीस आणलेला विमल, पानमसाला व गुटक्याची सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी पानटपऱ्या व किराणा दुकानात विक्री करण्यात येत आहे. यासर्वांमुळे आरोग्यवर विपरीत परिणाम होत असून, यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

यावल, चोपडा, रावेर हे तीनही तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमा रेषेवर गुजरात आणि मध्यप्रदेश असे दोन राज्य आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाल्याचे खाजगी वाहन किंवा एसटी द्वारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात वाहतूक होत आहे. त्यानंतर तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटख्याची टप्प्या टप्प्याने वाटप करण्यात येत आहे. प्रतिबंधित असलेल्या गुटक्याची एका महिन्यात सुमारे ५० ते ६० लाखांची विक्री करण्यात आली आहे.

याबाबतची संबंधित माहिती अन्न व प्रशासन विभागाला नाहीये का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. याविषयाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.