यावलमध्ये एकाच दिवशी ३ ठिकाणी घरफोड्या, संशयितास अटक

0

चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळील (ता. यावल) एका कृषी केंद्रात, तर शहरातील विरारनगर व मदिनानगर परिसर अशा तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहे.

कृषी केंद्रातील चोरीत सहभाग अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात विरारनगर परिसरात मध्यप्रदेशातील संशयितास अटक केली आहे. शहरातील हरिओमनगर शेजारी मदिनानगर परिसरातील रहिवासी रफीक खान नामदार खान (वय ५५) हे खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरीस आहेत.

त्यांनी शहरातील विस्तारित भागात आपल्या सून व मुलासाठी भाडे तत्वावर घर घेतले. १ ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घरातील मंडळी ही बाबूजीपुरा येथील घरात झोपण्यासाठी गेले असता चोरटयांनी घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दुसऱ्या घटनेत शहरातील विरारनगरमधील रहिवासी पुष्प विजय अहिरराव यांच्या घरचे कुलूप तोडून लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तिसऱ्या घटनेत शहरातील विरारनगरमधील रहिवासी पुष्पा विजय अहिरराव यांच्या घरचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली.

यवलमधील रहिवासी माजी नगराध्यक्ष दीपक रामचंद्र बेहेडे यांच्या वढोदे जवळील कृषी केंद्राच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून १० ते २० हजार रुपये किमतीचे कृषी साहित्य चोरून नेले. केंद्रातील चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.