लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय संघ उद्या म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरद्धचा सामना खेळण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला सून तो वर्ल्डकप २०२३ मधील कोणताही सामना खेळणार नाही. हार्दिकची जागा कोण घेणार हे ठरलं आहे.
पंड्याला कोणती दुखापत झाली?
१९ ऑक्टोबरला पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पांड्या जखमी झाला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करतांना हार्दिक पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पंड्यावर उपचार सुरु आहे. तो साखळी फेरीमधील सामने खेवर नाही असं आधी सांगण्यात आलं होत. मात्र आज तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मात्र त्याच्या जागी भारतीय संघामध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.