कोळी समाजास न्यायासाठी व भुसावळ मतदार बचाव साठी जळगाव येथे रेल रोको आंदोलन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 या रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संविधान आर्मी आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन भुसावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी दोन वाजता जळगाव येथील पत्रकार भवन येथे अशा दोन पत्रकार परिषदा आज संपन्न झाल्या…

यावेळी पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष व संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते जगन सोनवणे यांनी भुसावळ व जळगाव येथे  म्हणाले की, जळगाव कलेक्टर कार्यालयासमोर गेल्या पंचवीस दिवसापासून कोळी समाज आपल्या समाजाला जाती प्रमाणपत्र मिळाले पाहिजे हो न्याय मिळाला पाहिजे यासाठी अन्न त्याग अमरन उपोषण करीत आहे परंतु जिल्हा प्रशासन व तिन्ही मंत्री या न्याय आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे साप्ताहिक आंदोलन आज रोजी आम्ही जाहीर करीत आहोत…..

भुसावळ येथील रेल्वे उत्तर वार्डातील मतदार बचाव साठी साप्ताहिक आंदोलन

पुढे बोलताना जगन सोनवणे/बीएएलएलबी/म्हणाले की, भुसावळ येथील रेल्वे उत्तर वार्डातील हद्दीवाली चाळ, आगवाली चाळ, येथील पाच हजार मतदारांवर आधी झोपडपट्टी तोडून त्यांना उध्वस्त केले, बेघर केले, आणि आम्ही अनेक आंदोलन करून देखील त्यांचे आतापर्यंत पुनर्वसन झाले नाही उलट आमदार संजय सावकारे यांनी प्रशासनासोबत संगणमत करून या भागातील मतदारांची नावे वगळण्याचा डाव आखला आहे.. या रेल्वे भागातील उध्वस्त झालेल्या झोपडपट्टी धारक ओबीसी एससी एसटी मुस्लिम अशा मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी स्थलांतराच्या नावाखाली व सबबी खाली त्यांचे मतदार यादीतून नाव वकडण्याचे षडयंत्र आमदार संजय सावकार यांच्या माध्यमातून प्रशासनाला हाताशी धरून सुरू आहे.

या भागातील मतदारांचे भुसावळ शहरातील संविधान नगर, हुडको तसेच तापी नदीकाठी राहुल नगर, समता नगर, कंडारी व भुसावळ शहरातील व भुसावळ विधानसभा मतदारसंघातच ते सध्या राहत असून त्यांचा पूर्वीच्या पत्त्यावर त्यांचे नोटिसा त्यांना प्राप्त होणार नाही तर प्रशासनाने नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व नव्याने राहत असलेल्या या स्थलांतरित मतदारांचे आत्ताचे पत्ते दवंडी देऊन व प्रत्येक वार्डात लाऊड स्पीकर द्वारे माहिती देऊन आणि त्यांचे नावे नोंदविण्यासाठी प्रशासनाने कॅम्प आयोजित करावे व फक्त सात दिवसांची मुदत न देता वर्षभर ही प्रक्रिया राबवावी त्याशिवाय या मतदारांचे जैसे थी तैसेच स्थिती ठेवावी. या भागातील मतदार बचाव साठी आम्हाला हे साप्ताहिक आंदोलन करावे लागत आहे तेव्हा मतदानापासून मतदारांना वंचित ठेवू नये अशी मागणी आम्ही करीत आहोत.

जळगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन

आंदोलन पुरुष जगन सोनवणे म्हणाले की, दिनांक 6 नोव्हेंबर 2023 या रोजी संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून जळगाव रेल्वे स्टेशनवर दादर गोरखपूर काशी एक्सप्रेस डाऊन ची दुपारी एक वाजता आडविण्यात येईल. तसेच तिन्ही मंत्र्यांच्या घरावर लॉन्ग मार्च धडकणार

जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर दिनांक नऊ नोव्हेंबर 2023 या रोजी पाळधी ते जळगाव माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानावर सकाळी अकरा वाजता कोळी समाज बांधवांच्या उपोषण स्थळापासून तसेच दिनांक दहा नोव्हेंबर 2023 या रोजी जळगाव ते जामनेर कॅबिनेट मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानावर तसेच दिनांक दहा नोव्हेंबर 2023 या रोजी याच ठिकाणाहून आणि दिनांक 11 नोव्हेंबर 2023 या रोजी जळगाव ते अमळनेर कॅबिनेट मंत्री अनिल भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी आशा तिन्ही मंत्र्यांच्या घरावर विविध दहा संघटनांच्या वतीने लाँग मार्च धडकणार आहे. अशी माहिती यावेळी पत्रकार परिषद जाहीर करण्यात आली. तरी जनतेने मोठ्या प्रमाणात या रेल रोको लॉन्ग मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.