मुकेश अंबानींना धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणाला तेलंगणातील १९ वर्षाच्या तरुणाला शनिवार पहाटे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख गणेश रमेश वनपराधी असे केली असून, त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अंबानी याना पाच ईमेल आले होते त्यामध्ये पैशांची मागणी केली होती आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. असे पोलिसांनी संगीतले.

“हे काम किशिरवयीन मुलांनी केले असल्याचे दिसून येत आहे. आमचा तपास सुरु आहे आणि आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू,” मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देत सांगितले. २७ ऑक्टोबर रोजी शादाब खान या नावाने पाठवलेल्या पहिल्या मेमध्ये लिहिले होत, “जर तुम्ही (अंबानी) आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शुटर आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना आणखी एक धमकीचा ईमेल आला होता. त्यांच्याकडून 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. खंडणीची मागणी करणारे मेल सातत्याने येत आहेत.

नवीन मेलमध्ये धमकी पाठवणाऱ्याने दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान दोन धमकीचे ईमेल आले होते. पाठवणाऱ्याने स्वतः ची ओळख शादाब खान अशी करून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.