महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी रंगणार कुस्त्यांचा थरार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख आणि ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे. ७ ते १० नोव्हेंबर या काळात पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.

सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहोत. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ या कुस्तीस्पर्धेत सहभागी होणार आहे.

माती तसेच गादी गटात कुस्ती खेळवली जाईल. या स्पर्धेत सुमारे ८४० कुस्तीगीर सहभागी होतील, असेही सांगण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल.

महिंद्रा थार, ट्रॅक्टरसह मोठ्या बक्षिसांचा वर्षाव..
या स्पर्धेत विजेत्या मल्लांवर महिंद्रा थार, ट्रॅक्टरपेक्षा विविध बक्षिसांची लयलूट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडेल.

यंदा २ महाराष्ट्र केसरी स्पर्धा
दरम्यान, कुस्तीगीर संघटनेच्या वादामुळे यावर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत.धाराशिवला आणि पुण्याजवळील फुलगावमध्ये अशा दोन वेलवेगळ्या ठिकाणी कुस्ती स्पर्धा पार पडतील. कुस्तीपटू दोन्ही ठिकाणी खेळू शकणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.