लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतात व्हॉट्सअॅपने ७१.१ लाख अकाउंटवर बंदी घातली आहे. आयटी कायद्यानुसार व्हॉट्सअॅपच्या या सर्व अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. दर महिन्याला व्हॉट्सअॅप तक्रारींच्या आधारे कारवाई करते आणि मानण्याच्या शेवटी युजर्ससाठी सुरक्षा अहवाल जारी करते.
यंदा ही कारवाई १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान करण्यात आली होती. या कालावधीत +९१ देश कोड असलेल्या ७१, ११, ००० या व्हॉट्सअॅप अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. यापैकी २५, ७१, ००० अकाउंटवर कंपनीनेच बंदी घातली आहे. म्हणजेच लोकांनी म्हणजेच लोकांनी या अकाउंबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही.
सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपला तक्रार अपील समितीकडून सहा आदेश मिळाले आहे. ते सर्व स्वीकारण्यात आले होते. याआधी ऑगस्टमध्ये व्हॉट्सअॅपने भारतात ७४ लाख अकाउंट बंद केले आहे. सप्टेंबर महिन्यात १०, ४४२ युजर्सनी व्हॉट्सअॅपवर स्पॅमची तक्रार केली होती. अकाउंटच्या सपोर्टबाबत १, ०३१ तक्रारी, बंदी घालण्याबाबत ७,३९६, सुरक्षिततेबाबत १२७ आणि इतर सपोर्टबाबत 1,518 तक्रारी होत्या.
तुमचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते
२०२१ मध्ये नवीन IT नियम लागू केल्यानंतर, WhatsApp दर महिन्याला तक्रार अपील अहवाल जारी करते. यामध्ये स्पॅम, न्यूडिटी इत्यादी तक्रारींचा समावेश आहे. तुम्हीही तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरून अशी कोणतीही अॅक्टिव्हिटी करत असल्यास, तुमचे अकाउंटही बॅन केले जाऊ शकते.