Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महानगरपालिकेतील दैनंदिन कर्तव्य तसेच शहरातील विकास कामांसंदर्भात निवेदन
    जळगाव

    महानगरपालिकेतील दैनंदिन कर्तव्य तसेच शहरातील विकास कामांसंदर्भात निवेदन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सध्या दिवाळी सणाची लगभग सुरू झाली आहे. मात्र शहरात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले असून, केरकचरा जागोजागी साचलेला दिसून येत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरीयासारख्या गंभीर आजारांची लागन झालेले रुग्ण आढळुन येत आहे.

    तसेच जळगांव शहराच्या विकासाच्या प्रयत्नांवर महानगरपालिकेकडून संथगतीने कार्यवाही होत असल्याचे दिसत असुन शहरातील मुख्य रस्ते व अनेक वसाहतीमधील मोठया संख्येने पथदिवे रात्रीच्या सुमारास बंद असल्याने मेंटेनन्सची जबाबदारी असणाऱ्या कंपनीची कामे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना करावी लागत असल्याची शोकांतिका आहे. यासाठी विद्युत अभियंत्यांना मक्तेदार कंपनीकडूनच देखभाल व दुरुस्ती करण्याचे तातडीने आदेश देणे आवश्यक आहे.

    जळगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची अमृत योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र अमृत योजनेद्वारा करण्यात येत असलेला पाणीपुरवठा अशुद्ध असल्याचे दिसत असून, नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने अमृत जोडणी करणाऱ्या कंपनीने व्यवस्थित जोडणी केली नसल्याचे वास्तव्य आहे. या प्रकरणी आपण तातडीने दखल घ्यावी यासाठी आपल्याकडे निवेदन कालमर्यादेत उचित कार्यवाही करीत सादर करीत आहोत.

    जळगाव शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क व अधिकार असलेले तसेच शासनाने तातडीने मंजूर केलेला सातवा वेतन आयोगाचा लाभ अध्यात कर्मचाऱ्यांना मिळू शकलेला नाही. महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाच्या नावाखाली उशिरापर्यंत काम करण्याची सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

    मागण्या खालील प्रमाणे :-

    १) शहरातील मुख्य रस्ते व वसाहती मधील बंद असलेल्या पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे म.न.पा. कर्मचान्यांच्या ऐवजी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या मक्तेदार कंपनीला दिवाळीपूर्वी करण्याची सक्ती करण्यात यावी. (याप्रकरणी विद्युत अभियंत्यांना सक्तीचे आदेश देण्यात यावे.)

    २) राज्य शासनाने जळगांव शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश देवूनही कर्मचान्यांना ७ वा वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आले असल्याने कर्मचान्यांवरील अन्याय तातडीने दुर करून त्यांचा ७व्या वेतन आयोगाचा एक रकमी फरकासह लाभ देण्यात यावा.

    ३) शहरातील फेरकचरा व घाणीचे ढिग साचले असल्याने साफसफाई व स्वच्छता नियमित करून वाढत असलेले डेंग्यू, मलेरिया निवारणासाठी तातडीने उपाययोजना दिवाळीपूर्वी करण्यात यावी.

    ४) अमृत योजनेतर्गत सदोष जोडणी संदर्भात तपासणी करून तसेच लिकेज बंदीस्त करून स्वच्छ पाणीपुरवठ्याची उपाययोजना करण्यात यावी तसेच नवीन रस्ते तयार करण्यापूर्वी अमृत योजनेचे संयोजन नागरीकांना देण्यात यावे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif