उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वातावरणात सतत बदल होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी ढगाळ वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. सध्या राज्यात थंडीचं कडाका जाणवत असला तरी, वातावरण कमी जास्त अनुभवायला मिळत आहे. अशातच आता दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी देखील काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे किमान तापमानात वाढ होणार असल्याच हवामान खात्याने सांगितले आहे.

थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता
२९ जानेवारी नंतर महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण राज्यात कमी झालेली थंडी पुन्हा वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच २ फेब्रुवारी पर्यंत हि लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.