लोकशाही न्युज नेटवर्क
तरुणीसोबत पूर्वी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील २१ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह राहत असून त्या तरुणीचे किरण भाऊसाहेब कोलते रा. निधोरा ता. फुलंब्री जि. औरंगाबाद याच्याशी ओळख निर्माण झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांची भेटेगाठी वाढल्या. १३ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता किरण कोलते याने पीडित तरुणीला सोबत काढलेले जुने फोटो व्हाट्सअप आणि फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रांच्या मदतीने तिला तिच्या घरून वाहनातून नेत औरंगाबाद येथे नेले तिथे चाकूचा धाक दाखवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर तिला औरंगाबाद येथील बसस्थानक परिसरात सोडून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी ही कशीबशी चाळीसगाव तालुक्यात दाखल झाली. त्याने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला पीडित मुलीसह नातेवाईकांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी किरण भाऊसाहेब कोलते रा. निधोरा ता. फुलंब्री जि. औरंगाबाद मनोज शिंदे पूर्ण नाव माहित नाही आणि दोन अनोळखी इसम या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.