जळगाव ;- शहरातील एका परिसरात लॉजचा कुठलाही परवाना नसताना त्याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा पश्चिम बंगाल येथील विशीच्या वयोगटातील पाच तरुणी या हॉटेल वजा लॉजमधे आढळून आल्या. 3 डिसेंबरच्या सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सचिन सुरेश साळुंके (वय ३५ वर्ष, व्यवसाय नोकरी, नेम- उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर सोनवणे व शाम बोरसे या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.