लोकशाही न्यूज नेटवर्क
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’मध्ये कधी काय होईल हे कोणालाच माहित नसते. बिग बॉसचा प्रत्येक सिझन अधिकाधिक रंजक बनवण्यासाठी निर्माते शक्य ते सर्व प्रयत्न करतांना दिसतात. यावेळी शोचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. इतकेच नाही तर, निर्माते या सीझनमध्ये वेळोवेळी बरेच ट्विस्ट घेऊन येत आहे. ज्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मोठा झटका लागल्याशिवाय राहत नाही.
अशामध्ये आता पुन्हा बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट आला आहे. सर्व सदस्यांना एका झटक्यात बेघर करण्यात येत आहे. बिग बॉसच्या नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हे दिसत असून हा प्रोमो पाहून नेमकं बिग बॉसच्या घरात आता पुढे काय होणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. लवकरच बिग बॉसच्या या सीझनमध्ये एकाच घरात तीन शेजारी आहेत. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये तीन खोल्या आहेत. दिल का घर, दिमाग का घर आणि दम का घर. आता निर्माते एका झटक्यात सर्व सदस्यांना ही तिन्ही घरं खाली करण्याचे आदेश देतात. त्यामुळे घरातील सर्व सदस्य घाबरून जातात. या नव्या ट्विस्टमुळे बिग बॉसच्या घरात खळबळ उडते.
‘बिग बॉस १७’ चा रक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये घरातील वातावरण पूर्णपणे बिघाडलेले दिसत आहे. या प्रोमोमध्ये असे दिसून येत आहे की, अचानक संपूर्ण घराचे लाईट बंद होऊ लागतात आणि मग बिग बॉसकडून घोषणा होते. यादरम्यान बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्याचे घर खाली करण्यास सांगितले आहे. स्पर्धकांना त्यांचे सामान काढण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. यानंतर घरातील सर्वजण गार्डन एरियामध्ये बसलेले दिसतात.