व्हाईस ऑफ मिडीयाच्या बोदवड तालुकाध्यक्षपदी संदीप वैष्णव

0

 

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

बोदवड येथे तालुक्यातील पत्रकारांची बैठक व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा प्रतोद तथा ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत व्हाईस ऑफ मिडीया बोदवड तालुक्याची कार्यकारणी निवडण्यात आली असून, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी या निवडीस मान्यता देत कार्यकारणी जाहीर केली आहे.

कार्यकारणी खालील प्रमाणे.

अध्यक्ष – संदीप मधुकर वैष्णव (बैरागी), उपाध्यक्ष – निवृत्ती ढोले, उपाध्यक्ष – सुहास बारी, सचिव – अमोल भास्कर आमोदकर, सहसचिव – गोपीचंद सुरवाडे, सहसचिव – नाना रामभाऊ पाटील, संघटक – संजय ताराचंद कोटेचा, कोषाध्यक्ष – रवींद्र नारायण मराठे तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून महेंद्र निवृत्तीनाथ पाटील, पुरुषोत्तम गड्डम आणि सदस्यपदी सर्वश्री गोपाल व्यास, गणेश पाटील, जिआउद्दीन शेख, ईश्वर वाणी, अमोल व्यवहारे, जितेंद्र गायकवाड, सतीश बावस्कर, नितीन चव्हाण, अर्जुन आसणे.

Leave A Reply

Your email address will not be published.