खरेदीदार-विक्रेता संमेलनात जिल्ह्यात 68 सामंजस्य करार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक / महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा, खाजगी उद्योग व अन्न प्रक्रिया एस.पी.व्ही इ. च्या उत्पादनांच्या प्रचार, प्रसिध्दीसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत खरेदीदार-विक्रेता (Buyer-Seller Meet) संमेलनाचे खासदार उन्मेष पाटील यांचे अध्यक्षतेखाली व अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत 20 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

खरेदीदार-विक्रेता संमेलन (Buyer-Seller) कार्यक्रमात जळगांव जिल्ह्यातील प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभाची, भागीदार संस्था, युवक महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयंसहाय्यता गट, पुरस्कार प्राप्त शेतकरी/प्रगतशील शेतकरी व मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले. तद्नंतर तृणधान्यामध्ये विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा/गटांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी उपस्थित सर्वांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग अंतर्गत खरेदीदार-विक्रेताबाबत महत्व, उत्पादन, विपणन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. उद्योजकांनी खरेदीदार-कृषि उत्पादनाबाबत अटी व शर्ती व आवश्यक त्या माहितीमाहिती सविस्तर माहिती दिली.

प्रकल्प संचालक (आत्मा-2) कुर्बान तडवी यांनी स्मार्ट योजनेच्या खरेदी-विक्री कार्यप्रणाली मधील महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आत्मा योजनेच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे विविध खरेदीदारांसोबत 9 नविन सामंजस्य करार करण्यात आले. तसेच या वर्षात झालेल्या विविध सामंजस्य करारातून विविध खरेदीदारांनी खरेदी केलेल्या शेतमालाचे 15 धनादेश वितरण शेतकरी/ गटाना खासदार उन्मेष पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यात एकूण 68 सामंजस्य करार करण्यात आले. खासदार श्री. पाटील यांनी उपस्थितांना खरेदीदार व शेतक-यांना एकमेकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा व खरेदीदार विक्रेताबाबत महत्व, उत्पादन, विपणन व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. प्रकल्प विशेषज्ञ (पोक्रा) संजय पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.