‘विराट कोहली’ आयपीएल खेळणार नाही, दिग्गजाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

स्टार फलंदाज विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला असून, तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पण, तो इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये मैदानात परतेल, असे मानले जात आहे.

पण, यादरम्यान एक विधान समोर आले आहे. ज्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी कोहलीच्या आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यावर शंका व्यक्त केली आहे. आणि म्हटले आहे की तो कदाचित आयपीएलमध्ये खेळणार नाही…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो सहभागी झाला नाही. कारण त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता. बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला ब्रेक दिला.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, कोहली आयपीएल २०२४ मधून मैदानात परतणार आहे. मात्र आता सुनील गावसकर यांनी एक धक्कादायक विधान केल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. खरं तर, जेव्हा सुनील गावसकरला विचारले गेले की, कोहली बराच वेळ बाहेर राहिल्यानंतर आयूपीएलमध्ये धाव करेल का, तेव्हा माजी भारतीय कर्णधार म्हणाले की, कदाचित तो आयपीएलमध्येही खेळणार नाही.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एक मुलगा झाला आहे. १५ फेब्रुवारीला अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला. अनुष्का आणि विराट कोहली या दोघांनीही पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिल्ली. आता तो २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ सह मैदानात परततो की नाही हे पाहणे बाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.