प्रदूषण नियंत्रण मंडळाने दूध संघाला बजावली नोटीस

0

जळगाव : प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून जिल्हा दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून तुमचे औद्योगिक उपक्रम बंद का केले जाऊ नये, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. दि. २७ रोजी सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे अन्यथा पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले जातील, असा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे. प्रादेशिक अधिकारी एल. एस. भड यांनी ही नोटीस बजावलेली आहे.

जिल्हा दूध संघाच्या परिसरातील नागरिकांनी दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणी करण्याचे पत्र दिले होते. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करणसिंग राजपूत व मनपा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता काही त्रुटी जिल्हा दूध संघात आढळून आल्या होत्या. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दूध संघाला नोटीस बजावून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.