अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

0

 

जळगाव:;- शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बीड येथील मूळ रहिवासी विश्वंभर खडके वय २१ हा विद्यार्थी शहरातील जी एच रायसोनी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशनच्या पहिल्या वर्षांचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये तो आपल्या मित्रासोबत राहत होता, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो वसतीगृहावर निघून गेल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद करत विश्वंभरने लॅपटॉपच्या चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.सायंकाळी विश्वंभरचा रुम पार्टनर शिवमसिंह राजपूत् हा खोलीवर आला. परंतु, खोली आतून बंद असल्याने त्यानेकुठलाही दरवाजा ठोठवला, प्रतिसाद मिळत मात्र, नसल्याने आतून शिवमसिंह याने रुमचा दरवाजा जोरात ढकलला. या वेळी रुमची कडी उघडल्याने शिवमसिंह याला आपला मित्र विश्वंभर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.  घटनेची माहिती होस्टेलचे रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतत्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, नितीन ठाकूर, मुकेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचमाना केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला.याबाबात एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.