चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय आणि टायगरवर प्रेक्षकांनी फेकले चपल-बूट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे सध्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय आणि टायगर हे लखनौमध्ये पोहोचले होते. यावेळी दोघेही स्टंट करत स्टेजवर आले. अक्षय आणि टायगर स्टेजवर आल्यानंतर चाहत्यांनी स्टेजजवळ जाण्यासाठी बॅरिकेट्स तोडले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी केला लाठीचार्ज
बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यादरम्यान अनेकांनी स्टेजच्या दिशेने चप्पल आणि दगड फेकण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या इव्हेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अक्षय आणि टायगरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. काही चाहत्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलीस अनियंत्रित जमावाला नियंत्रित करताना दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.