जळगाव ;- जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील एकावर वारंवार महिलेस थांबवून तिच्याकडे फोन नंबरची मागणी करणाऱ्यावर पहूर पोलीस स्टेशनला विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात आरोपी अब्दुल गणी याने जामनेर तालुक्यात एका गावात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेस तू चांगली आहेस का तुला किती पैसे हवे मी तुझ्या घरी येणार होतो असे म्हणौन महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी आणि वारंवार फोन नंबर मागून त्रास देणाऱ्या अब्दुल मनानं गणी याच्याविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.