घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलाला पळविले ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;- शहरातील मास्टर कॉलनीतून १७ वर्षीय मुलगा घरासमोर खेळात असताना त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मेहरूण परिसरातील मास्टर कॉलनीत राहणारा १७ वर्षीय मुलगा घरासमोर १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खेळत असताना त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद त्याच्या आईने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेचा तपास सपोनि दयानंद सरवदे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.