आज लोकशाहीचा विजय – उद्धव ठाकरे

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क:

शिवसेनेतील बंडाळी नंतर राजकीय समीकरण पालटले. त्यानंतर मात्र दोन गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरु झाली, शेवटी प्रकरण न्यायालयात गेले. त्यासंबंधी आज न्यायालयाने आपला निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लावला. यानंतर ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया नोंदवत म्हटले की, कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आमचा न्यायदेवर सार्थ विश्वास आहे. आता दसरा मेळाव्याला वाजत गाजत, आनंदात आणि गूलाल उधळत या. बाळासाहेबांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. शिस्तीला गालबोट लागता कामा नये. आजचा दिवस लोकशाहीचा विजय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचा भविष्य ठरवणारा असेल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाकरे पुढे म्हणाले, इतर लोक काय करतील याची मला कल्पना नाही. पण दसरा मेळावा आपली परंपरा आहे. आजच्या निकालासोबतच दसरा मेळाव्याकडे देशासह जगातील आपल्या बांधवांचे लक्ष लागले आहे म्हणून उत्साहात येतानाच शिस्तीत या. शुभ बोल रे नाऱ्या असे आपण म्हणतो. आता चांगली सुरुवात झाली. विजयादशमीला शिवसेनेचा नारा दिला गेला. कोरोना काळ सोडला तर परंपरा कायमच आहे. आजोबा आणि वडील बाळासाहेब ठाकरेंनी तेथे भाषण दिले.

ते पुढे म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीचा विजय आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचा भविष्य ठरवणारा असेल. शिवसेनेचा देशातील लोकशाही किती काळ आणि कशी राहील याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल हे मी शिंदे गटासारखे बोलणार नाही. लोकशाहीचे भवितव्य मी सांगेल परंतू सुप्रीम कोर्टात निकाल काय लागेल हे नाही सांगता येणार. उत्साह अमाप आहे. एकजूट सुद्धा तशीच ठेवा, पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयचा, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. निवडणुका जवळ आहेत. पालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यावर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यामुळे गटतट पाडू नका, रुसवे-फुगवे नको. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले. उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशी जोरदार घोषणाबाजी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.