IND vs SA; दुसऱ्या सामन्याची वेळ बदलली, ‘या’ वेळी खेळला जाणार सामना

0

लोकशाही न्यून नेटवर्क

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळ्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ८ गडी राखून विजय मिळवला.

आता या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु झाला होता. पण दुसऱ्या सामन्याची वेळ वेगळी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवार १९ डिसेंबरला खेळाला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सुरु होईल, त्याच वेळी, नाणेफेक ४ वाजता होईल. स्टार स्पोर्ट्सवर चाहत्यांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल, दुसरीकडे थेट प्रवाह डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.