लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकाच नाही तर, तर तिला जवळ खेचत जबरदस्ती चुंबनही घेतला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव विनायक विळेकर (वय ७०) असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचा नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजीव हा पुण्यातील एका ऑफिसमध्ये काम करतो. याच ऑफिसमध्ये पीडित महिला देखील कमला आहे.
रविवारी (१७ डिसेंबर) महिला कामावर असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने पिडीतेकडे चुंबनाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. इतकाच नाही तर, त्यांनी महिलेला जबरदस्तीने खेचत तीच चुंबन देखील घेतलं. या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तातडीने डेक्कन पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार डेक्कन पोलिसांनी ७० वर्षीय आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.