लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई आणि जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तनुजा यांना वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आराजांमुळे जुहू येथील रुग्नालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उचार सुरु आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सध्या तनुजा यांच्यावर डॉक्टरच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. तनुजा यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वयोमानानुसार, उद्भवत असणाऱ्या काही आजारांमुळे जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. बॉलिवूडची चुळबुळी म्हणून तनुजा यांची सर्वत्र ओळख आहे. अभिनेत्रीने अवघ्या लहान वयातच आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तनुजा यांनी ‘छबिली’ या पहिल्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांचा हा पहिला चित्रपट १९६० मध्ये रिलीज झाला होता. तनुजा यांनी फक्त हिंदीच नाही तर, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची तनुजा समर्थ मुलगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.