भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येत आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिजेश यांना 2 आठवड्यांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर मेरठमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, नुकताच मुंबईत परतल्यानंतर रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे कुटुंब मुंबईत राहतात. सोमवारी ब्रिजेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाच्या बातमीनंतर भोजपुरीच नव्हे तर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी 46 वर्षांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात काम केले होते. 1979 मध्ये ‘सैया तोहरे कारण’ या चित्रपटातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. 1980 मध्ये आलेला ‘टॅक्सी चोर’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

Leave A Reply

Your email address will not be published.