अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची तब्बेत खालावली, विष प्रयोग झाल्याचे समोर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला फूड पॉयजनिंग झाल्याचे समोर येत आहे. त्याच्यावर विष प्रयोग झाल्याच बोलले जात होत, पण यापैकी काहीही झालेलं नाही. आता असं समोर आलं आहे की, त्याला १०२ डिग्री टॅप होता. अनेकवेळा त्याला उलट्या झाल्या. सुरक्षा कारणांमुळे त्याला रुग्नालयात दाखल करण्यात आलेले नाही. उपचारासाठी डॉक्टरांच्याच टीमला घरी बोलावण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम कराची स्थित आपल्या बंगल्यात असल्याचं बोललं जात आहे. बंगल्यातील पहिला मजला वॉर्डरुममध्ये बदलण्यात आला आहे. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली दाऊदवर उपचार सुरु आहेत. मागच्या आठवड्यात सोमवारी दाऊदला अनेकदा उल्टी झाली. १०२ डिग्री ताप असल्याने डॉक्टरांच्या टीमला क्लिफ्टन देखरेखीखाली दाऊदवर उपचार सुरु आहे. मागच्या आठवड्यात सोमवारी दाऊदला अनेकदा उल्टी झाली. 102 डिग्री ताप होता. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमला क्लिफ्टन कराची येथील निवासस्थानी बोलवण्यात आलं. ६८ वर्षांच्या दाऊदला कराची येथील बंगल्यात तीन-चार बॉटल ड्रीप देण्यात आले आहे.

तीन दिवसांच्या उपचारादरम्यान दाऊदच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं म्हंटले जाते आहे. पण सध्या तो आराम करत आहे. सततच्या होणाऱ्या उलट्यांमुळे दाऊद अशक्त झाल्याचे सांगितल जातंय. डाक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. दाऊद अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीय. दाऊदच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीतील घरात दाऊद भोवती ५ ते ६ सुरक्षा लेयर आहे. त्याला विष देणं किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. D गँगशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.