प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे – मुजफ्फरपुर दरम्यान विशेष रेल्वे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे – मुजफ्फरपुर दरम्यान विशेष गाडी चालिण्यात येणार आहे.

०५२८६ पुणे  – मुजफ्फरपुर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- गुरुवार दिनांक २१.१२.२०२३ आणि २८.१२.२०२३ ला पुणे  येथून २३.०० वाजता सुटून शनिवारी ०६.०० वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल.

०५२८५ मुजफ्फरपुर – पुणे  सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- बुधवार दिनांक २०.१२.२०२३ आणि २७.१२.२०२३ ला मुजफ्फरपुर येथून १३.०० वाजता सुटून गुरुवारी २१.०० वाजता पुणे येथे पोहचेल.

थांबे : दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना,  प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा , दानापुर, पाटलीपुत्र आणि  हाजीपुर

संरचना: २०

एलएचबी कोच: एसी फर्स्ट -१,एसी टू- २,एसी थ्री-११, एसी थ्री इकॉनॉमी-४, जेनरेटर कार – २

आरक्षण : गाडी क्रमांक ०५२८६ पुणे – मुज्जफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसची बुकिंग दिनांक १८ डिसेंबरपासून सर्व आरक्षण केंद्र आणि वेबसाइट irctc.co.in  वर सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.