‘वेड’ चित्रपटात मोठे बदल! लवकरच प्रेक्षांच्या भेटीला येणार नवं व्हर्जन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित ‘वेड’ (Ved) या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने, गाण्याने, वेड लावलं आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा लवकरच 50 कोटी रुपयांच्या टप्प्याकडे पोहोचणार आहे. प्रेक्षकांना ज्या पद्धतीने ऑफ स्क्रीन रितेश-जिनेलियाची जोडी आवडते तशीच ती ऑन स्क्रीन देखील प्रेक्षकांना भावली आहे. विशेष म्हणजे जिनिलिया (Genelia) ने खूप मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या स्क्रीन वर अभिनय केला आहे. वेड चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कलाविश्वात अशी गोष्ट पहिल्यांदाच ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे.

एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच कुणी एखादं गाणं नव्याने समाविष्य करत नाही. मराठीच नव्हे तर बॉलिवूड (Bollywood) किंवा टॉलिवूडमध्येही (Tollywood) असं घडलं नव्हतं. पण ‘वेड’ चित्रपटात आता ‘सत्या’ (रितेश देशमुख) आणि ‘श्रावणी’ (जिनिलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझं’ या गाण्याचं नवीन व्हर्जन लवकरच समोर येणार आहे. यासोबतच तीन नवे सीन्सही चित्रित करून त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.‘वेड’चं हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना थिएटरमध्ये येत्या २० जानेवारीपासून पहायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.