विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक , प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण – प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर आदी प्राध्यापकवृंद व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात प्रा. डॉ. अविनाश खंबायत यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर सभेचे समन्वयक व प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.

महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच प्राध्यापकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश तसेच विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण असली पाहिजे असे सांगितले. यानंतर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे उत्तरे देत त्यांचे समाधान केले. यावेळी आयोजित चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले.

पालकांनी विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले. प्रा. प्रिया टेकवानी यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. शरयू बोंडे, प्रा. तुषार वाघ व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.