वसंतवाडी येथून एकाची दुचाकी लंपास

0

जळगाव ;– तालुक्यातील वसंतवाडी येथे एकाच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्जन श्रावण चव्हाण वय ३४ हे तालुक्यातील वसंतवाडी येथे राहावयास असून सलूनचा व्यवसाय करतात . त्यांच्या घरासमोर त्यानी २४ जून २०२३ रोजी दुचाकी क्रमांक एम एच १९ बी एल ४४८९ लावली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला २८ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पोना किशोर पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.