शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या महिला सुरक्षा धोक्यात आलीय. त्यातच आता शाळकरी मुली देखील असुरक्षित आहेत. वरणगाव शहरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव शहरातील एका भागात शाळकरी मुलगी आपल्या परिवारासह राहते. गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता शाळकरी मुलगी शाळेत जात असताना संशयित आरोपी निलेश राखुंडे यांनी तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यामध्ये थांबवत माझ्याशी पाच मिनिटात बोल असे सांगून तिला लाजत उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.

दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश राखुंडे यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुकर भालशंकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.