सप्तशृंगी देवी मंदिराजवळ दरड पडल्याने कोळन्हावी मार्गे रस्ता बंद

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

तापी व मानकी नदीच्या संगमाजवळ असलेल्या श्री निवासीनी सप्तशृंगी देवीच्या मंदिराजवळ कराड कोसळल्याने कोळन्हावी मार्गे रस्ता बंद करण्यात आला आहे.  भाविकांनी साकळी मनवेलमार्गे शिरागड या रस्त्याने प्रवास करुन दर्शनासाठी यावे असे आवाहन शिरागड येथील श्री निवासीनी सप्तशृंगी देवी संस्थाने केले आहे.

श्री निवासीनी सप्तशृंगी देवीचे लहानगड म्हणून शिरागड येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तापी नदीला १६ सप्टेंबर रोजी मोठा पुर आल्याने कोळन्हावी गावाहुन देवीच्या मंदिराजवळच्या रस्ता व मंदिरातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची डोंगर कराड कोसळल्याने मंदिरात दर्शन करीता येणाऱ्या भाविकांचे हाल होत आहे.

रस्त्याचे काम संस्थामार्फत दुरुस्त करण्यात येत असल्यामुळे संस्थेने पाच दिवस कोळन्हावी मार्गे शिरागड येथे दर्शनासाठी येणारा रस्ता बंद ठेवला आहे. भाविकांच्या दर्शना करीता साकळी मनवेल मार्गे शिरागड या रस्ताने प्रवास करावा असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी योगराज सोळंके, सरपंच योगीता सोनवणे , प्रताप सोनवणे, शांताराम सोळंके, पो.पा.सुधाकर सोळंके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.