श्री. क्षेञ मांडकी येथे श्री संत बाळु मामांचा अभिषेक व पादुका पुजन सोहळा संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील श्री. क्षेञ मांडकी येथे दि.११ रोजी श्रावण सोमवारी द्धादशी या दिवशी सकाळी ५ वाजता श्रींचा अभिषेक व पादुका पुजन, ध्वज चढविणे हा सोहळा आयोजीत करण्यात आला होता. तसेच दि. २१/८/२०२३ ते दि. ११/९/२०२३ पर्यंत राञी ८.३० वाजता श्री.संतसदगुरु बाळु मामा यांचे ग्रंथ पारायन वाचन करण्यात आले होते. दि. ११ रोजी या ग्रंथ पारायणाची सांगता झाली. त्यानंतर गावातुन श्री. संत सदगुरु बाळु मामा यांची पालखी मिरवणुक टाळ, मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. यावेळी संत सदगुरु बाळु मामा यांच्या जयघोषाने परीसर दुमदुमला होता. व भक्तीमय वातावरण बनल्याचे दिसुन आले. या मिरवणुकीत भाविक मोठया संख्येने सहभागी होते. सकाळी ९ वाजता महाआरती झाली. यानंतर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. अशी माहिती श्री. क्षेञ मांडकी येथील श्री. संत सदगुरु बाळुमामा देवालयाचे पुजारी हभप. सुभाष महाराज चौधरी यांनी दिली. या मंदिरावर बाळुमामांचा ग्रंथ पारायण वाचन सुरु होते. पारायण वाचन गिरडचे किरण जोशी महाराज यांनी केले. पारायणाचे हे सातवे वर्ष आहे. भाविकांनी दर्शनासह विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला. गावात गिरणा काठावर श्री. बाळु मामांचे भव्य मंदिर लोकवर्गणीतुन उभारण्यात आलेले आहे. मंदिरावर , दर्शन, पुजा, अर्चा भाविक वर्षभर करीत असतात. वर्षभर उत्सव, याञोत्सव साजरा करण्यात येतो. मंदिराचे सध्या नव्याने बांधकाम सुरु असुन दि. १३/१२/२०२३ रोजी मंदिराचा जिर्णोद्धार म मुर्ती स्थापना करण्यात येणार आहे. नियोजन चालु आहे.अशी माहितीही सुभाष चौधरी यांनी दै.लोकशाहीशी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.