भडगाव येथे यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रदान समारंभ उत्साहात साजरा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यानिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव येथे आज दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२३ मधील उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गुण गौरव व पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रशांत पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पवन अग्रवाल ,साहेबराव पाटील, मधू पाटील, जाकीर शेठ, रवींद्र येवले, कुणाल दादा, राजेंद्र सोनवणे,युवराज पाटील, योगेश पाटील सर्व सन्माननीय संचालक उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन गणपती आरती करुन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य हेमंत खैरनार सर यांनी केले.

अखिल भारतीय व्यवसाय ऑगस्ट २०२३ परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व अंतिम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.उद्योजक पवन अग्रवाल यांनी देखील रोजगार करण्यापेक्षा स्वयंरोजगार कसा उभारता येईल याचे अनमोल मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रशांत पवार यांनी यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सोनवणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी कार्यक्रमाचे समन्वयक सचिन खैरनार, प्रवीण परदेशीं, राकेश पाटील, तायडे, कोष्टी सर आदींनी परिश्रम घेतले. शेवटी चंद्रकांत राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.