वरणगावमध्ये इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव शहरातील मकरंदनगर येथील रहिवासी असलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि १७) शनिवार रोजी घडली.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मकरंदनगर मधील रहिवाशी असलेल्या शशीकांत रघुनाथ चौधरी (वय ४१) यांनी आपल्या राहत्या घराच्या छताला असलेल्या पंख्याला वायरच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही बाब लक्षात आल्याने त्यांना तात्काळ खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल इले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही
शशिकांत चौधरी हे जळगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. मात्र दोन दिवसाच्या सुट्या असल्याने आपली पत्नी व दोन मुलांच्या सोबत वारणगावला आपल्या घरी नातेवाईकांना भेटणाया आले होते.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रघुनाथ देवराम चौधरी यांच्या सांगण्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपस नागेंद्र तायडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.