शेकडो वरणगावकरांच्या उपस्थितीत बस स्थानक चौकात ध्वजारोहण

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मागील एक ते दीड महिन्यापासुन बस स्थानक चौकात सर्कल सह कायम स्वरूपी तिरंगा ध्वज लावण्याचा मानस मनाशी बाळगत प्रजासत्ताक दिनानिमित्त शेकडो शहरवासीयांच्या साक्षीने माजी सैनिकाच्या प्रमूख उपस्थीत सकाळच्या सुमारास कायम स्वरूपी ध्वजारोहण करण्यात आला

शहरातील बस स्थानक चौकातील अवजड वाहणाची वाहतूक चौपद्रीरीने वळाल्याने वाहनाचे प्रमाण कमी झाल्याने या चौकात शहराच्या सौदर्यात भर पाडण्यासाठी व एक वैभव प्राप्त व्हावे तेही लोक सहभागातून या हेतूने भाजपाचे सुनिल काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व राजकिय पदाधिकाऱ्यांनी प्रियदर्शनी राष्ट्रध्वज समीती स्थापन करीत यासाठी पुढाकार घेऊन याचे आयोजन आखले त्यात त्यांना राजकिय नेते मंडळीकडून याकामी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे कबुल केले होते.

मात्र यात संपुर्ण शहरवाशीचा सहभाग हवा यासाठी प्रत्येक नागरिकाकडून निधी संकलन करीत सदर कामाला सुरुवात केली होती. मगील दिड महिण्या पासुन सुरु असलेले काम २४ जानेवारीला पुर्ण झाल्यानंतर खांबावर ध्वजाचे प्रात्यक्षिक करण्यात आल्या नंतर २६ जानेवारीला सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस स्थानक चौकात एकत्रीत जमा होत महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी परेडची रंगीत तालीम केल्या नंतर शहरातील सेवा निवृत झालेले माजी सैनिकाच्या हस्ते शेकडो शहरवाशीयाच्या उपस्थीत ध्वजारोहन करण्यात आले . या प्रसंगी उर्दु शाळा , गं सा चौधरी विद्यालय , महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.