Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध
    शैक्षणिक

    बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 27, 2023Updated:January 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्युज नेटवर्क
    यंदा महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या १२ वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये होणार असून या विषयीचे ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करण्यात आलं आहे.

    आज सकाळी ११ वाजेपासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाइटवर हे हॉलतिकीट्स उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

    फेब्रुवारी-मार्च २०२३साठी १२ वीच्या परीक्षेचे ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट काढून घ्यायची आहेत.हे प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असं मंडळाने सांगितलं आहे.या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असं बोर्डाने नोटीसमध्ये सांगितलं आहे.हॉल तिकीटमध्ये काही चुक असल्यास प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या.हॉल तिकीटवरचा फोटो, सही, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातल्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे ताबडतोब पाठवायची, असंही सांगण्यात आले आहे.

    हॉल तिकीट विद्यार्थ्याकडून हरवलं तर संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने पुम्ही प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा. फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सही शिक्का मारावा, अशाही सुचना करण्यात आल्या आहेत.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    HSC EXAM Maharashtra State Board 12th Exam Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif