रील बनवणे आले जिवाशी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज काल तरुणांमध्ये सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे, कमीत-कमी वेळात सोशल मीडियावर जास्त व्ह्यूज च्या नादात आपल्या जीवाचा विचार न करता वाट्टेल ते करायला तयार असतात. परभणी मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणासाठी जात असतांना चार विध्यार्थी रील बनवत होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यातील एक तरुणाचा आज मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहे. मृत झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील चव्हाण असे होते तर तो परभणीच्या पाथरी सोनपेठ राहत होता.

सोशल मीडियावर दुसऱ्यांचे अनुकरण करत तरुण पिढी वाट्टेल ते करण्यास तयार असते. आपण कश्या पद्धतीने फेमस होऊ शकतो यासाठी ते आपला जीव धोक्यात टाकून रील बनवतात. आणि आपल्या जीवाशी खेळ करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.