वरणगावात तरुणाची नैराशातून आत्महत्या…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील रामपेठ परिसरात राहणाऱ्या तरुणाने नैराशातून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना दि २४ शुक्रवार रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, निलेश सुकलाल भोई (३५) रामपेठ परिसरात राहणारा तरुण हा रांगोळी विकण्याचे काम करीत होता, तीन वर्षापुर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर त्याच्या लहान भावाचेही निधन झाले. यामुळे निलेश हा नैराश्यात असल्याने हे नैराश मनात ठेवत आपल्या राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळाफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. या बाबत मयत निलेश च्या वडिलांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पो.हे.कॉ नावेद अली हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.