वंदे भारत ट्रेनची जबाबदारी टाटा समूहाला..!

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आधुनिक भारताची ओळख असलेली वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रकल्पाचा मोठा भाग आहे. देशाला वेगळी ओळख मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात रस्ते जोडणीचे प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. उभा-आडवा भारत वेगाने जवळ येत आहे. आता वंदे भारत ट्रेन प्रकल्प लवकरच विस्तारणार आहे. देशात पुढील वर्षी अजून वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. त्यासाठी जागतिक ब्रँड असलेल्या टाटा समूहाला या विशेष ट्रेन तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांच्या बांधणीचे काम टाटा समूहाला (Tata Group) दिले आहेत. त्यामुळे इतर गुंतवणूक दारांनासुद्धा फायदा होणार आहे.

एका वर्षात टाटाच्या कारखान्यातून नव्या कोऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाहेर पडून देशाच्या सेवेत धावतील. ट्रेन तयार करण्याच्या कार्याला गती देण्यासाठी भारतीय रेल्वे आणि टाटा स्टील यांच्या दरम्यान करार करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये फर्स्ट क्लास एसीपासून ते थ्री टायर कोचपर्यंतची सर्व आसान व्यवस्था टाटा समूहाची आहेत. रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा एलएचबी कोच तयार करण्याचा ठेका पण टाटालाच दिला आहे. याअंतर्गत पॅनल, खिडकी आणि रेल्वेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात येत आहे.

पुढील वर्षी ही वेगवान ट्रेन ट्रॅकवर देशभरात धावतील. या ट्रेनमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. 22 रेल्वेंची निर्मिती टाटा स्टील करेल. भारतीय रेल्वे आणि टाटा यांनी याविषयीच्या एका करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. येत्या दोन वर्षात रेल्वेने 200 नवीन रेल्वे सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एका वृत्तानुसार, रेल्वे पुढील वर्षात, 2024 च्या पहिल्या तिमाहीतच वंदे भारत ट्रेनमध्ये पहिली स्लीपर कोच तयार करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.