ऐन निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन…

0

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क

निवडणूकांची चाहूल लागली आहे. सर्वच नेत्यांच्याची धाकधूक सुद्धा निवडणुकांच्या वेळेस वाढलेली दिसू येते. पण त्यातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष ध्रुव नारायण (Dhruva Narayan) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. नारायण यांना छातीत दुखू लागलं, तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरनं त्यांना सकाळी 6.40 वाजता रुग्णालयात दाखल केलं. पण, त्यांना वाचवता आलं नाही.

प्रभावशाली दलित नेता म्हणून ओळख

ध्रुव नारायण हे जुन्या म्हैसूरचे प्रभावी दलित नेते होते. तसेच, ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे मित्र होते. निवडणुकीच्या काळात ते चामराजनगरमधील मोठे नेते मानले जात होते. ध्रुव नारायण यांनी दोन वेळा खासदार आणि आमदार म्हणूनही काम केलं आहे. यावेळी ते नांजनगुडू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. दरम्यान, खासदार प्रताप सिंह यांनी ध्रुव नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here